पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ‘शॉर्ट व स्लिपर’ घालुन आंदोलन 

पुणे: पुण्यातील सेनापती बापट रोडवरील हॉटेल “एजंट जॅक” या रेस्टॉरंटमध्ये स्लीपर व शॉर्टस घालून आलेल्या ग्राहकाला हॉटेल प्रशासनाने प्रवेश नाकारला होता.  या गोष्टीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज हॉटेल समोर आंदोलन केले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे व कार्यकर्त्यांनी ‘शॉर्ट व स्लिपर’ घालुन रेस्टॉरंट मध्ये प्रवेश केला आणि रेस्टॉरंट प्रशासनाला याचा जाब विचारला.  रेस्टॉरंट प्रशासनाने घडलेल्या प्रकाराने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त केली. आणि परत असा प्रकार घडणार नाही असे सांगितले. यावेळी शहराध्यक्ष राकेश कामठे, सिनेट सदस्य अभिषेक बोके, उपाध्यक्ष मनोज पाचपुते, महेश हांडे, ऋषी भुजबळ, नितीन राठोड, निखिल बटवाल , विकी वाघे, केतन ओरसे, अमोल पालखे, उपस्थित होते .

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)