“सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेची नाव नोंदणी सुरू

सातारा – साताऱ्यातील व देशभरातील, किंबहुना जगभरातील मॅरेथॉनपटू दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात, अशा “सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ चे 8 वे पर्व आता लवकरच येत आहे. या वर्षी ही स्पर्धा रविवार, दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजी संपन्न होणार आहे. ऐतिहासिक साताऱ्याच्या ह्या गौरवशाली परंपरेच्या आठव्या पर्वाचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी तयारीला लागू या, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

  • नावनोंदणीसाठी (फक्त ऑनलाइन पद्धतीच्या) तारखा खालीलप्रमाणे
    1) सातारकर धावपटूंसाठी ऑनलाइन नावनोंदणीचा कालावधी – सोमवार, दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी सकाळी 5 पासून शुक्रवार, दि 5 एप्रिलपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत.

    2) बाहेरगावच्या मरेथॉनपटूंसाठी ऑनलाइन नावनोंदणीचा कालावधी – रविवार, दिनांक 7 एप्रिल 2019 रोजी सकाळी 5.00 पासून गुरुवार, दिनांक 11 एप्रिल पर्यंत रात्री 12.00 वाजेपर्यंत.

  • नावनोंदणी व अधिक महितीसाठी संकेतस्थळ -www.shhm.co.in 

    प्रवेश संख्या मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर नावनोंदणी करावी. निर्धारित संख्या पूर्ण झाल्यावर (किंवा या मुदतीनंतर) कोणत्याही परिस्थितीत मॅरेथॉनसाठी पुन्हा प्रवेश मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. हाफ मरेथान स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी नोंदणी शुल्क रुपये 1,100/- (अधिक जीएसटी) असून सातारा जिल्ह्याबाहेरील स्पर्धकांसाठी नोंदणी शुल्क रुपये 1,800/- (अधिक जीएसटी) आकारण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)