अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहीर होईल- अजित पवार

पनवेल: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पनवेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पार्थच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आलेलो नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 48 जागा निवडून याव्या यासाठी आलो असल्यचे अजित पवारांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अजित पवार यांनी बुधवारी मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये हजेरी लावली. पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहीर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  तसेच आता समविचारी पक्ष आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढल्या कामांना जोमानं सुरुवात केली पाहिजे, असा निर्धार केला.

-Ads-

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या काँग्रेस भवनात आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक…

Posted by Ajit Pawar on Wednesday, 13 March 2019

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)