सौदी दुतावासाच्या रस्त्याला पत्रकार खाशोगींचे नाव 

वॉशिंग्टन: सौदी सरकारच्या आदेशावरून ठार करण्यात आलेले पत्रकार जमाल खाशोगी यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि या प्रकरणात सौदी सरकारला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेतील काही अधिकाऱ्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी सौदी अरेबियाचे दूतावास ज्या भागात आहे त्या भागातील रस्त्याला पत्रकार जमाल खाशोगी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकार खाशोगी यांची तुर्कीतील सौदीच्या दुतावासात गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात हत्या झाली आहे. सुरूवातीला त्यांचा ठावठिकाणा आम्हाला माहिती नसल्याचा दावा करणाऱ्या सौदी सरकारने नंतर त्यांच्या मृत्युच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणात थेट सौदीच्या क्राऊन प्रिंसवरच तपास यंत्रणांनी ठपका ठेवला आहे. पत्रकार खाशोगींचे नाव सौदीचे दुतावास ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्याला ठेवण्यात यावे अशी मागणी अनेक नागरीकांनी ऑनलाईन पोलिंगमधून केल्यानंतर अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव मान्य केला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)