श्रीदेवींच्या मृत्यूभोवतीचे गूढ आता आणखी वाढले

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ आता आणखी वाढले आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू बईतील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये 24 फेब्रुवारीच्या रात्री झाला होता. मात्र, श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नसून, त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा केरळ मधील जेल जीडीपी आणि आयपीएस अधिकारी ‘ऋषिराज सिंह’ यांनी केला आहे. त्यांनी हा दावा एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार केला आहे.

सिंह यांनी त्यांच्या सरकारी डॉ. उमादथन भारत यांच्या हवाल्यातून ही माहिती दिली आहे. डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन होते. गुन्हेगारी घटना आणि विशेषत: खूनी रहस्य सोडवण्यात ते तरबेज होते. ऋषिराज सिंह यांनी उमादथन यांना श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नाही तर त्यांची हत्या झाली असल्याचा दावा केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी उमादथनशी श्रीदेवी यांच्या हत्येबद्दल बोलत होतो. तेव्हा त्यांनी मला ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी श्रीदेवींच्या हत्येचा जवळून अभ्यास केला असून, तपासावेळी अशा काही घटना समोर आल्या ज्यातून असं स्पष्ट होतं की श्रीदेवी यांची हत्या करण्यात आली आहे. त्यासंबंधी अनेक पुरावेदेखील माझ्याकडे आहेत. ‘कोणतीही व्यक्ती दारुच्या नशेत एका छोट्या बाथटबमध्ये बुडून मरू शकत नाही.’ असं ऋषिराज सिंह यांनी सांगितलं आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)