मध्यप्रदेशात अपहरण करुन जुळ्या भावांची हत्या

चित्रकूट – मध्य प्रदेशातील चित्रकूट येथून 12 जानेवारी रोजी अपहरण केलेल्या पाच वर्षांच्या दोन जुळ्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली. 20 लाखांची खंडणी घेऊनही आरोपींनी त्यांची हत्या करुन यमुना नदीत फेकून दिले. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच मध्यप्रदेश हादरले असून यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील चित्रकूट धाम येथील तेलाचे व्यापारी बृजेश रावत यांच्या पाच वर्षांच्या जुळ्या मुलांचे 12 जानेवारी रोजी अपहरण झाले होते. दुचाकीस्वारांनी मध्य प्रदेशातील सदगुरु सेवा ट्रस्टच्या शाळेतून हे अपहरण केले होते. आरोपींनी आधी मुलांना चित्रकूट येथे आरोपी लकीच्या घरी दोन दिवस ठेवले. यावेळी आरोपी बाहेरुन घर बंद ठेवत होते जेणेकरुन कोणालाही आपण येथे लपलो आहोत याचा संशय येऊ नये. यानंतर त्यांनी मुलांना उत्तर प्रदेशातील बांदा येथील एका भाड्याच्या घरात नेले. जिथे हत्येच्या आधी काही दिवस मुलांना लपवून ठेवण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अत्यंत हुशारीने काम करत होते. खंडणी मागण्यासाठी आरोपी आपल्या मोबाइल फोनचा वापर करत नसत. रस्त्यावरुन जाणाऱ्या अनोळखी लोकांना आपल्याला एक महत्त्वाचा फोन करायचा असल्याचं सांगत ते फोन करत होते. इंजिनिअरिंग शिकणारे हे विद्यार्थी एका ऍपच्या सहाय्याने नंबर लपवत असत. यामुळे सायबर पोलीस त्यांना पकडण्यात अपयशी ठरत होते.

यावेळी, एका पादचाऱ्याला आरोपींच्या बोलण्यावरुन संशय आला आणि त्याने त्यांच्या दुचाकीचा फोटो काढला. पोलिसांशी संपर्क साधून त्याने दुचाकीचा फोटो दिला. पोलिसांनी तपास केला असता ही दुचाकी रोहित द्विवेदीच्या नावे असल्याचे समजले. रोहित उत्तर प्रदेशातील बबेरु येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी एक-एक करत सहा आरोपींना पकडले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. 20 लाखांची खंडणी घेऊनही आरोपींनी त्या लहान मुलांची हत्या करुन यमुना नदीत फेकून दिले होते.

गुन्ह्यात सहभागी सहा अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पद्म शुक्‍ला, लकी सिंह तोमर, रोहित द्विवेदी, रामकेश यादव, पिंटू उर्फ पिंटा यादव अशी या आरोपींची नावे आहेत. रामकेश यादव दोन्ही मुलांची शिकवणी घेत असे. पद्म आणि लकी हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)