भिवंडीत अज्ञातांकडून तरुणाची निघृण हत्या

भिवंडी: भिवंडी शहरातील बहात्तर गाला परिसरात तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला करून हत्या केली आहे. संतराम जयस्वाल असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. बहात्तर गाला परिसरालगत जंगल परिसर आहे. या जंगलाच्या परिसरात संतरामवर अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. त्यावेळी संतराम आरडाओरडा करत बहात्तर गाला या परिसरात धावत आला.

हल्ल्यात संतराम रक्तबोंबाळ झाला होता. मात्र मदत मिळण्याआधीच संतरामचा मृत झाला. या घटनेची माहिती स्थानिकांनी तातडीने भोईवाडा पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून पोलीस अधिक तपास करित आहेते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)