नाशिकमध्ये व्यावसायिकाची हत्या

नाशिक: नाशिकमध्ये सहा लाखांची लूट करून व्यावसायिकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. अविनाश शिंदे असे हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. हा हल्ला ते दुकान बंद करुन घरी जात असताना करण्यात आला. ही घटना नाशिकमधील इंदिरानगर परिसरात घडली आहे.

अविनाश शिंदे हे नाशिकमधील सुपर ग्राहक बाजार या मिनी सुपर मार्केटचे संचालक होते. रात्री ते दुकान बंद करुन घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अविनाश यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र अविनाश शिंदे यांनी विरोध करताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करत त्यांच्या हातात असलेली पैशांची बॅग घेऊन पळून गेले.

अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात अविनाश शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेत आले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
21 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)