मध्य प्रदेशातील मंत्र्याला प्रचारावेळी मारहाण 

भोपाळ – मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूकीमुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार होत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देण्यात येत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आश्वासने देणाऱ्या भाजपच्या विद्यमान आमदार व मंत्र्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. असाच एका प्रसंग भाजपचे मंदसौर येथील आमदार यशपाल सिंह सिसोदिया यांच्यासोबत घडला आहे. प्रचारादरम्यान झालेल्या वादादरम्यान एका तरुणाने यशपाल सिंह यांच्या कानशिलात लगावली.

गेल्या दहा वर्षांपासून यशपाल सिंह सिसोदिया मंदसौरमध्ये आमदार आहेत. मंदसौरमधील अलावदाखेडी गावात ते प्रचाराला गेले होते. त्यावेळी एका युवकाने सिसेदिया यांच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. सिसोदिया यांना भाजपने तिसऱ्यांदा मंदसौर येथून विधानसभेचे तिकिट दिले आहे. यावेळी सिसोदिया यांचा मुकाबला कॉंग्रेसचे नेते नरेंद्र नाहटा यांच्याशी होणार आहे.

दरम्यान सिसोदिया यांना थोबाडित मारणाऱ्या तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलाचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, मानसिक संतुलन ठिक नसल्यामुळे या तरुणावर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच सिसोदिया यांनी त्या तरुणाविरोधात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)