आईनेच केला मुलावर चाकू हल्ला

नेवासे – फोनवर किती बोलतेस असे विचारल्याचा राग आल्याने मध्यरात्री भर झोपेत असताना आईने मुलाचे तोंड दाबून चाकूने वार केल्याने मुलगा गंभीर जखमी झाला. नेवासे तालुक्‍यातील गिडेगाव येथे मंगळवारी हा प्रकार घडला. जखमी झालेल्या विशाल दीपक साळुंखे (वय 18) याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची आई शोभा दीपक साळुंखे हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी शोभा फोनवर बोलत होती. त्यावेळी विशाल म्हणाला, किती वेळ फोनवर बोलतेस, तेव्हा आई शोभा हिने मी कितीपण वेळ बोलेल तुला काय करायचे, असे रागाने बोलली. त्यानंतर विशाल जेवण करून बाहेर अंगणात झोपलेला असताना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आईनेच त्याचे तोंड दाबले व हातातील चाकूने कानाखाली व तोंडावर वार करत होती, विशालने चाकू धरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातावर वार झाला. तेव्हा आई शोभा ही तुझ्यात किती बळ आहे ते पाहतेच असे म्हणत चाकू मारत होती. विशालने कशीतरी सुटका करून घेतली. त्याने त्याची आत्या संगिता दिगंबर शेळके यांना फोन करून बोलावून घेतल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून आईनेच मुलावर थेट चाकूहल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)