बहुप्रतिक्षित “केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित

बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट “केसरी’चा प्रदर्शित करण्यात आला आहे. याबाबतची माहित निर्माता करण जोहर आणि अक्षय कुमार यांनी स्वःत ट्‌विट करत दिली.
अक्षय कुमारने 12 फेब्रुवारीला “केसरी’ची पहिली झलक शेअर करत लवकरच केसरीचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही केली होती. सोशल मीडियावर “केसरी’च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. तसेच अक्षय कुमारचे डायलॉगही चाहत्यांना खूपच आवडले आहेत. या डायलॉगचेही विविध Memes बनविण्यात येत असून त्याचा संबंध पाकिस्तान, क्रिकेट आणि नोटाबंदी यासारख्या मुद्‌दांशी जोडला जात आहे.

केसरी हा एक युद्धपट असून याची कथा गिरीश कोहली आणि अनुराग सिंह यांनी लिहिली आहे. यात अक्षय कुमार सोबत अभिनेत्री परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 36व्या शीख रेजिमेंटचे 21 सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर “केसरी’ चित्रपट आधारित आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या त्या 21 सैनिकांची अविश्वसनीय शौर्यगाथा केसरीतून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाणार आहे. “केसरी’च्या ट्रेलरनंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)