मोस्ट फेव्हर्ड नेशनच्या अंतरंगात

पुलवामा येथे सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. मात्र हा दर्जा काढून घेताना होणाऱ्या विलंबामागे आयात आणि निर्यातीचे समीकरण कारणीभूत आहे. मोस्ट फेव्हर्ड नेशन (एमएफएन) चा दर्जा असणाऱ्या देशाला व्यापारविषयी सुविधा मिळतात. जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ)चे सदस्य देश एकमेकांना एमएफएनचा दर्जा देऊ शकतो. डब्ल्यूटीओ अस्तित्वात आल्यानंतर वर्षाच्या आतच भारताने 1996 रोजी पाकिस्तानला एमएफएनचा दर्जा दिला होता. 2011 मध्ये पाकिस्तानने भारताला एमएफएनचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. आता हा दर्जा काढून घेण्याची घोषणा केली असली तरी एका बाजूने या निर्णयाची अंमलबजावणी करता येत नाही. यास आयात-निर्यातीचे समीकरणही कारणीभूत आहेत.

भारतातून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या देशात पाकिस्तानचा समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने पाकिस्तानातून 3500 कोटींची आयात केली तर निर्यातीचे मूल्य 13 हजार 697 कोटी रुपये होते. भारताची आंतरराष्ट्रीय निर्यात 641 अब्ज डॉलरची असून त्यात 2.67 अब्ज डॉलरची निर्यात पाकिस्तानच्या वाट्याला येते. एकूण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत पाकिस्तानशी होणाऱ्या व्यापाराचे प्रमाण 0.41 टक्के इतके आहे. त्याचवेळी पाकिस्तानातून होणाऱ्या आयातीचे प्रमाण हे जगातील अन्य देशाच्या तुलनेत 0.13 टक्के इतकेच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत आणि भूतान यांच्यात सध्या (2016) वार्षिक 8 हजार 723 कोटी रुपयांची उलाढाल होते. यादरम्यान पाकिस्तानशी 17 हजार 200 कोटींचा व्यवहार झाला आहे. आजघडीला पाकिस्तानशी होणारा व्यापार हा 18 हजार कोटी रुपयांचा आहे.

मोस्ट फेव्हर्ड नेशनच्या दर्जामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत देशांना त्याचा लाभ मिळतो. हा दर्जा दिल्याने बाजारसंदर्भात नुकसान होणार नाही, अशी हमी संबंधित देशाला मिळते. आयात-निर्यातीवर विशेष सवलत दिली जाते. तसेच व्यापार कमी आयात शुल्कावर होतो. भारताने काही दिवसांपूवीच हा दर्जा काढून घेतला आहे. डब्ल्यूटीओच्या आर्टिकल 21 बीनुसार कोणताही देश कोणत्याही स्थितीत हा दर्जा काढून घेऊ शकतो. विशेषत: सुरक्षाविषयक आणीबाणी स्थिती निर्माण झाली तर हा दर्जा काढून घेता येतो. अर्थात यासाठी बऱ्याच अटी आणि नियमांची पूर्तता करावी लागते.

परिणाम काय?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिमेंट, साखर, कापूस, फळेभाजीपाला, ऑईल, मीठ, ड्रायफ्रुट, स्टिल यासारख्या वस्तूंची आयात-निर्यात केली होते. भारत आता अनेक वस्तूंसाठी पाकिस्तानचे दरवाजे बंद करू शकतो.

– कीर्ती कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)