केदारनाथ पुरामध्ये हरवलेली मुलगी ५ वर्षांनी सापडली 

file photo

अलिगढ : एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला साजेशी वाटेल अशी घटना अलिगढ येथे घडली आहे. २०१३ साली केदारनाथ येथे देवदर्शनासाठी गेलेल्या चंद कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. केदारनाथ येथे आलेल्या महापूरामध्ये आई, वडील आणि मुलगी असे संपूर्ण कुटुंबच वाहून गेले होते. त्यापैकी काही दिवसांनंतर केवळ मुलीची आई घरी परतली होती.

आता या घटनेला पाच वर्ष उलटल्यानंतर ही मुलगी घरी परतली आहे. मतिमंद असलेल्या या मुलीला काही समाजसेवकांनी जम्मू येथील अनाथालयामध्ये भरती केले होते. जन्मापासूनच मतिमंद असलेल्या चंचलला आपल्या घरचा पत्ता सांगता येत न्हवता, मात्र मागच्या काही महिन्यांपासून तिच्या बोलण्यामधून अलिगढ हा शब्द येत असल्याचे अनाथालयातील कर्मचाऱ्यांना जाणवले. यानंतर अलिगढ पोलिसांच्या मदतीने या मुलीला तिच्या कुटुंबियांच्या हवाले करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपली नात घरी परतल्याने आपण खुश असून हा चमत्कारच आहे असे मत मुलीचे आजोबा हरीश चंद यांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)