शरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये छेडछाड; सायबर सेलकडे तक्रार दाखल

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी पोलिसांत तक्रार दाखल

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तसेच शरद पवार यांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार केल्याबदल राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरित्या नाव न घेता भाजपावर टीका देखील केली आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या विकिपीडीया प्रोफाईलमध्ये दि.25 मार्च 2019 रोजी Most Loyal (सर्वात प्रामाणिक) ऐवजी Most “Corrupt” (सर्वाधिक भ्रष्ट) असे संपादित करण्यात आले ,आता त्यात बदल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीसह मुंबईसह राज्यातील विविध शहरातील पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडूनही याबादल तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच याविरोधात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चारकोप पोलिस स्टेशन (मुंबई)

कोथरूड, पुणे

नवी मुंबई

कराड

https://twitter.com/sach14info/status/1110810619085766662

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)