किमान उत्पन्न हमी योजना अभ्यासपूर्ण : चिदंबरम यांचा दावा 

नवी दिल्ली –काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेद्वारे देशातील सर्वाधिक गरीब असलेल्या २० टक्के कुटुंबांना वर्षाला प्रत्येकी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. राहुल गांधी यांनी या योजनेचे नामकरण किमान उत्पन्न हमी योजना असे केले असून ही योजना आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा असेल. या योजनेद्वारे देशातील ५ कोटी कुटुंबांची आणि २५ कोटी लोकांची दारिद्र्यातून सुटका होईल असा दावा काँग्रेसने केला आहे.

दरम्यान विरोधकांकडून काँग्रेसच्या या या योजनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केली जात आहेत. विरोधकांनी निर्माण केलेल्या प्रश्नांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी उत्तरे दिली असून ते म्हणतात, “काँग्रेसद्वारे जाहीर करण्यात आलेली किमान उत्पन्न हमी योजना ही अभ्यासपूर्ण योजना असून आम्ही देशभरातील अत्यंत दारिद्र्यात असणाऱ्या कुटुंबांचा अभ्यास केला आहे. दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या कुटुंबांच्या दैनंदिन खर्चाबाबत माहिती गोळा केली आहे. या माहितीच्या आधारेच ही योजना आखण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)