“बीजेएस’तर्फे “स्मार्ट गर्ल’ सक्षमीकरणाचा कानमंत्र 

वडगाव मावळ येथील स्व. रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उपक्रम

वडगाव मावळ   – भारतीय जैन संघटना, वडगाव मावळ शाखा यांचे वतीने वडगाव मावळ येथील स्व. रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल येथे “स्मार्ट गर्ल’ या युवती सक्षमीकरण शिबिराची सुरुवात करण्यात आली.

सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक राजेंद्र म्हाळसकर तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जैन संघटना पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सुराणा होते. इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनींसाठी आत्मजाणीव, संवाद आणि नातेसंबंध, मासिक पाळी स्वच्छता, आत्मसन्मान, स्व-संरक्षण, निवड आणि निर्णय, मैत्री आणि मोह तसेच पालकत्व या विषयांवर सहा सत्रांमध्ये दोन दिवसीय शिबीर घेण्यात आले.

या प्रसंगी बोलताना राजेंद्र म्हाळसकर यांनी मुलींमध्ये भविष्यात समाजात वावरतांना या शिबिरात शिकविलेल्या बाबींचा नक्कीच उपयोग होईल, असे मत व्यक्‍त केले व उपक्रमाचे कौतुक करत या पुढेही अशा विधायक उपक्रमांना संस्था सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. प्रमुख अतिथी राजेंद्र सुराणा यांनी आपल्या मनोगतात भारतीय जैन संघटनेची विविध कार्ये विशद केली.

भारतीय जैन संघटना वडगांव शहर अध्यक्ष कांतीलाल बाफना यांनी प्रास्ताविक करत या उपक्रमाची माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव ढोरे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत भविष्यात देखील असे विधायक उपक्रम आयोजित केले जातील अशी ग्वाही दिली. मुख्याध्यापिका टी एन साईलक्ष्मी यांनी तरुणींना अशा प्रशिक्षण शिबिराची निश्‍चितच गरज असल्याचे मत व्यक्‍त करत समाधान व्यक्‍त केले. प्रशिक्षक सुषमा गांधी यांनी आपल्या मनोगतात या शिबिरात शिकविल्या जाणाऱ्या गोष्टींची माहिती दिली.

प्रशिक्षक म्हणून सुषमा गांधी, रोशनी कांदी, प्रविणा पंडित तर निरीक्षक म्हणून डॉ.विनया केसकर आणि माधुरी नलावडे यांनी काम पाहिले. या प्रसंगी नारायणराव ढोरे, बाळासाहेब काळे, झुंबरलाल कर्णावट, सनी सुराणा , संदीप बाफना , मनोज बाफना , सुरेंद्र बाफना, साहिल बाफना, नीरज बाफना तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. महिला शाखा अध्यक्षा कल्पना बाफना , प्रमोदिनी कर्णावट, माधुरी बाफना, सुश्‍मिता बाफना, सीमा बाफना, सुरेखा बाफना, अनिता बाफना, रक्षा बाफना, मंगल बाफना, रश्‍मी बाफना, यांनी नियोजन केले. स्वागत डॉ.सुनील बाफना, सूत्रसंचालन भूषण मुथा आणि आभार प्रदर्शन शीतल मुथा यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)