महापौर बंगल्याच्या जमिनीखाली उभारणार बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक

मुंबई महानगरपालिका व स्मारक संस्थेचा झाला करार

मुंबई: दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबत आज मुंबई महापालिका व बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान करार झाला. महापौर बंगला ही ऐतिहासिक वास्तू असल्याने वास्तूच्या जमिनीखाली हे स्मारक उभारले जाणार आहे. या करारामुळे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्याला गती मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाने महापौर बंगला व परिसरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. स्मारक उभारण्यासाठी सर्व प्राधिकरणाकडून आवश्‍यक परवानग्या मिळाल्या आहेत. त्यानुसार आज महापौर बंगला व परिसरातील जमिन बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक विश्वस्त संस्थेला भाडेतत्वावर देण्याबाबत आज मुंबई महापालिका व स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान करार झाला. या करारामुळे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

यावेळी संस्थेचे सदस्य सचिव तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या करार प्रक्रियेवेळी महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सदस्य विशाखा राऊत, प्रकल्पाचे समन्वय सुधीर नाईक तसेच मुंबई महापालिका सचिव प्रकाश जेठे, उपायुक्त चंद्रशेखर चौरे, उपायुक्त पराग मसूरकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)