पढवलेली मुलाखत म्हणजे मॅच फिक्‍सींगच 

एरिक ट्रॅपिअर यांनी आज या कराराविषयी काही खुलासे करताना कॉंग्रेस पक्षाकडून होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तथापी कॉंग्रेसने मात्र त्यांचा हा खुलासा फेटाळला आहे. आम्हाला या प्रकरणात निष्पक्ष चौकशी हवी आहे. असल्या बनावट खुलाशांवर आमचा विश्‍वास नाही असे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की कंपनीच्या प्रमुखांनी भारतीय वृत्त संस्थेला दिलेली ही मुलाखत कोणीतरी पढवल्यासारखी आहे.अशा पढवलेल्या मुलाखतींमधून राफेलचा घोटाळा दडपला जाणार नाहीं.

यात आरोपी आणि आरोपीशी संगनमत असलेला सहआरोपी यांच्या प्रतिपादनला कायद्याच्या लेखी काही िंकंमत नाही हा कायद्याचा पहिला नियम आहे. आरोपी आणि सहआरोपी स्वत:लाच निर्दोष ठरवू शकत नाहीत हा दुसरा नियम आहे अशा शब्दात त्यांनी कंपनी सीईओंच्या दाव्याची पोलखोल केली. दसॉल्ट कंपनी आणि भाजप सरकार मधील हे मॅच फिक्‍सींग आहे यातून मोदी सरकारचा भ्रष्टाचार लपणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)