मोदींवरील चित्रपटाविषयी निवडणूक आयोगाने मागवले निर्मात्यांचे मत

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत एक चित्रपट बनवण्यात आला असून ऐन निवडणूक काळात त्याचे प्रसारण होणार असल्याने त्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारे निवेदन काल कॉंग्रेसच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यावर निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या निर्मात्याचे म्हणणे मागवले आहे. हा चित्रपट 5 एप्रिलला रिलिज व्हायचा आहे.

हा सरळसरळ भाजपचा प्रचार असून तो आचार संहितेचा भंग आहे. चित्रपटाच्या निर्मीती प्रक्रियेत भाजपचेच लोक आहेत किंवा भाजपशी संबंधीत लोक आहेत अशी माहिती आयोगाला देण्यात आलेल्या निवेदनात कॉंग्रेसने नमूद केले आहे. कॉंग्रेसच्यावतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी हे निवेदन आयोगाला कालच दिले होते. आता निर्मात्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या चित्रपटाविषयी निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)