“महाभारत’ला यावर्षी सुरुवात होणार

या वर्षी बॉलिवूडमध्ये बिग बजेट चित्रपटांची चांगलीच रेलचेल असणार आहे. २०१९ मध्ये पन्नास कोटी रुपये बजेट असलेले किमान 100 सिनेमे रिलीज होण्याची शक्‍यता चित्रपट जाणकारांद्वारे वर्तविण्यात येत आहे. दरम्यान देशातील सर्वात महागडा सिनेमा ठरू शकणाऱ्या, 1000 कोटी रुपये बजेट असलेल्या “महाभारत’लाही याच वर्षी सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. या संपूर्ण सिनेमाच्या निर्मितीला 4 ते 5 वर्षे लागू शकतात.

आमिर खानच्या नेतृत्वाखाली अमिताभ बच्चन, अजय देवगण, हृतिक रोशन, फरहान अख्तर, रणवीर सिंह, अभिषेक बच्चन, सनी देओल, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, दीपिका पदुकोण, ऐश्‍वर्या राय बच्चन, रेखा, विद्या बालन, मनोज वाजपेयी, अनुपम खेर यांच्यासारखे दिग्गज कलाकार सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये काही दक्षिणात्य कलाकारांनाही घेतले जाण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय स्पेशल इफेक्‍टस आणि ग्राफिक्‍सचा वापरही सर्रास होणार आहे. त्या तांत्रिक कामासाठी हॉलिवूडच्या तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे. सध्या तरी सिनेमाच्या कथेसाठीचे संशोधन सुरु आहे. त्याच बरोबर कलाकारांच्या निवडीचेही काम सुरु आहे. स्वतः आमिर खान लक्ष घालणार असल्यामुळे कथेमधील प्रत्येक बारकावे व्यवस्थित तपासून घेतले जाणार आहेत. “बाहुबली’ची निर्मिती करणारे एस.एस. राजामौली हे या “महाभारता’ची निर्मिती करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)