नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी जोरात

काठमांडू – नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी दक्षिण पंथी पक्षांनी केली आहे. नेपाळचा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद रद्द करून त्याला पुन्हा हिदू राष्टृाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सन 2006 मध्ये झालेल्या जन आंदोलनानंतर नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली होती आणि सन 2008 मध्ये नेपाळ हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र जाहीर करण्यात आले होते.

माजी उप पंतप्रधान कमल थापा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने पंतप्रधान के पी ओली शर्मा यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात धर्मनिरपेक्षतेच्या तरतुदी रद्द करून नेपाळ हे हिंदू राष्ट्र घोषित करण्याची आणि संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे. खोतांग जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत मंगळवारी हे निवेदन पंतप्रधानांना पाठवण्यात आलेले आहे. संघराज्यवाद चालू ठेवायचा किंवा नाही याबाबत जनमत घेण्याची मागणीही या निवेदनात केलेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंदू हा नेपाळमधील सर्वात मोठा धर्म आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार नेपाळमध्ये 81.3 हिंदू, 9.0 टक्के बौद्ध, 4.4 टक्के मुस्लिम 3.0 टक्के किरातीस्ट (स्वदेशी वंशाचा धर्म), 1.4 टक्के ख्रिश्‍चन, 0.2 टक्के शीख, 0.1 टक्के जैन आणि आणि0.6 टक्के अन्य धर्माचे वा धर्म नसलेले लोक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)