कांदा, ठिबक व पाईपलाईन जळून खाक
खटाव – खटाव-वडूज रस्त्यावर म्हारकी नावाच्या शिवारात अज्ञाताने वणवा पेटवल्याने आगीचा भडका शेतात पसरून खटाव येथील कुंडलीक भगवान कांबळे यांचे सुमारे दिड लाखांचे नुकसान झाले. वणव्यात कांदा, ठिबक व पाईपलाईन जळून खाक झाली. तसेच बोअरवेलचीही हानी झाली.
गुरुवारी दुपारी अज्ञाताने वणवा पेटवला. यामुळे कुंडलीक कांबळे यांच्या शेतापर्यंत आग पसरली. आग विझवण्याचा प्रयत्न अपुरा पडला. या आगीत सव्वा एकर क्षेत्रातील काढलेल्या कांद्याची ऐरण, बोअरवेलसह सातशे फूट पाईपलाईन व ठिबक पूर्णपणे जळाले. या आगीत सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. या घटनेची नोंद पुसेगांव पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. दुर्घटनेत मोठी हानी झाली असून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी दादा कांबळे यांनी केली आहे.
Ads