1994 मध्ये डिजनीतर्फे पहिल्यांदा रिलीज करण्यात आलेला ऍनिमेटेडपट ‘द लायन किंग’ आजही नाईंटीजच्या किड्ससाठी तेवढाच स्पेशल आहे यात शंका नाही. मात्र त्यातच भर म्हणून डिजनीतर्फे हा चित्रपट पुन्हा एकदा नव्याने रिलीज करण्यात आला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेऊन जंगलावर आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लढणाऱ्या छाव्याची कहाणी ‘द लायन किंग’ चित्रपटात दाखवली आहे.
#TheLionKing sets the BO on ???… Proves all forecasts/predictions wrong, as biz crosses ₹ 50 cr in 3 days… Trends much, much better than #TheJungleBook [₹ 40.19 cr]… Fri 11.06 cr, Sat 19.15 cr, Sun 24.54 cr. Total: ₹ 54.75 cr. India biz. All versions.
— taran adarsh (@taran_adarsh) July 22, 2019
मात्र, द लायन किंग चित्रपटाने रिलीज नंतर पहिल्या तीन दिवसातच तब्ब्ल 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. येत्या कालावधीत हा चित्रपट आणखी विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. द लायन किंग चित्रपट भारतामध्ये हिंदीसह तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये 2140 स्क्रीन वर रिलीज करण्यात आला आहे.
#Hollywood films in #India… Top 3 *opening weekend* biz…
1. #AvengersEndgame ₹ 158.65 cr [2019]
2. #AvengersInfinityWar ₹ 94.30 cr [2018]
3. #TheLionKing ₹ 54.75 cr [2019]
⭐️ #TheLionKing is the only *non-Avenger* film in this list.
Note: Fri-Sat biz. Nett BOC. India biz.— taran adarsh (@taran_adarsh) July 22, 2019