पुणे : चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरूणाचा खून केल्याप्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या दोन मुलांसह तिघांना शिवाजीनगर येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस, एच, ग्वालानी यांनी हा आदेश दिला आहे
चेतन तानाजी निम्हण, तुषार तानाजी निम्हण आणि मुन्ना निम्हण अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. एप्रिल 2013 मध्ये चेतन आणि तुषार यांनी भावकीतील वादातून प्रतिक रामभाऊ निम्हण (19) याचा गोळया झाडून खून केला होता. पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या पूर्वी चेतन आणि तुषारला बनावट जामीन आदेश तयार करून त्याचा उपयोग केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.