सीपीडब्ल्युडीच्या सर्व कार्यालयात एलईडी बल्ब लावणार

नवी दिल्ली: केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या देशभरातील सर्व कार्यालयांमधील सर्व जुने बल्ब बदलून तेथे येत्या 31 डिसेंबर पर्यंत एलईडी बल्ब बसवण्यात यावेत अशी सूचना विभागाने केली आहे. हा विभाग सध्या केंद्रीय नागरीविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयांतर्गत येतो आणि त्या मंत्रालयाने तसे परिपत्रक आज जारी केले आहे.

सीपीडब्ल्युडीच्या ताब्यात सध्या एकूण 1241 इमारती आहेत. त्यातील 223 इमारतींमध्ये एलईडी बल्ब लाऊन झाले आहेत आणि सध्या हे काम अन्य 230 इमारतींमध्ये सुरू आहे. उर्वरीत इमारतींमध्येही 31 डिसेंबर पर्यंत हे काम पुर्ण केले जाणार आहे. सीपीडब्ल्युडी या विभागाकडे सरकारी इमारतींची देखभाल आणि त्यांच्या भोवती कुंपण वगैरे सुविधा निर्माण करण्याचे काम केले जाते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)