उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूरमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर –  लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणातील घोडेबाजारही जोरात सुरु झाला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूर मधील महत्वाचे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे मोठे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले कि, उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूर मधील महत्वाचे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार तर दोन दिवसात सोलापूरमधील नेते प्रवेश करणार आहेत. तसेच राज्यातील एक-एक मोठे घराणे दररोज भाजप सोबत येईल, असा दावा त्यांनी केला आहे.

What is your reaction?
201 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
4 :heart_eyes:
1 :blush:
6 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)