सर्जिकल स्ट्राईकचे हिरो करणार कॉंग्रेसच्या कृती दलाचे नेतृत्व

नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्‌द्‌यावर कॉंग्रेसने कृती दलाची स्थापना केली आहे. त्याचे नेतृत्व सर्जिकल स्ट्राईकचे हिरो आणि भारतीय लष्कराचे निवृत्त अधिकारी डी.एस.हुडा हे करणार आहेत.

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्‌द्‌यावर व्हिजन डॉक्‍युमेंट बनवण्यासाठी कॉंग्रेसने संबंधित कृती दलाची स्थापना केली. त्या कृती दलाच्या रचनेबाबत चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हुडा यांची भेट घेतली. त्यानंतर तज्ञांच्या गटाशी चर्चा करून हुडा व्हिजन डॉक्‍युमेंट बनवणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्जिकल स्ट्राईकच्या हिरोने कॉंग्रेसशी केलेली हातमिळवणी चर्चेचा विषय ठरणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचे राजकियीकरण करत असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून सातत्याने झाला. त्यामुळेही या घडामोडीला महत्व आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सप्टेंबर 2016 मध्ये जम्मू-काश्‍मीरच्या उरीत भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला केला. त्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करून सर्जिकल स्ट्राईक केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)