वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण ११ ऑगस्ट रोजी

शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण शुक्रवारी (दि.27) आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसले, ते संपूर्ण भारतीयांनी पहिले. हे चंद्रग्रहण 3 तास 55 मिनिटांचे होते तर त्यातील खग्रास स्थिती 1 तास 43 मिनिटे होती.

चंद्रग्रहणानंतर यंदाच्या वर्षातील तिसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण आपणास ११ ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे १५ फेब्रुवारी रोजी दिसले होते. तर दुसरे सूर्यग्रहण हे १३ जुलै रोजी दिसले होते. हे सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण असेल. जे ३ तास आणि २८ मिनिटे राहील.

-Ads-

ग्रहणाची वेळ आणि कुठे दिसेल:
भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी सुरु होईल आणि संध्याकाळी ५ वाजता संपेल. हे खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने जगातील काहीच भागात ते दिसेल. यावेळी ते उत्तर गोलार्धातील देशात दिसेल. उत्तर युरोप पासून ते पूर्व आशिया आणि रशिया मध्ये हे खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

वर्षातील शेवटचे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)