प्रादेशिक पक्षांकडे राष्ट्रीय दृष्टिकोनाचा अभाव : काँग्रेसचे जेष्ठ नेते आर सी खुंटिया

हैदराबाद : काँग्रेसचे जेष्ठ नेते आर सी खुंटिया यांनी आज प्रादेशिक पक्षांवर जोरदार निशाणा साधताना, ‘प्रादेशिक पक्षांकडे राष्ट्रीय दृष्टिकोनाचा अभाव असून, त्यांचे लक्ष हे केवळ प्रादेशिक ‘भावनांना’ चिथावणी देऊन सत्ता काबीज करणे हेच आहे.’ असा आरोप केला.

“देशातील सर्वच प्रादेशिक पक्ष हे विशिष्ट प्रदेशाचे हित जपण्यासाठीच स्थापले गेले असल्याने, त्यांच्याकडे देशव्यापी दृष्टिकोनाचा तसेच राष्ट्रीय धोरणांचा अभाव आढळतो.” असे मत तेलंगणा काँग्रेसचे जेष्ठ नेते आर सी खुंटिया यांनी व्यक्त केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या विधानसभा निवडणुकांतील विजयाबाबत विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलताना, “प्रादेशिक पक्षांचे केवळ एकाच धोरण असते आणि ते म्हणजे सत्ता काबीज करणे. हे पक्ष प्रादेशिक भावनांना चिथावणी देऊन सत्ता प्राप्त कारण्यामध्येच धन्यता मानतात.” असे देखील ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)