चाकू हल्ल्यातील तरुणाची मृत्यूची झुंज अपयशी

वाकी: अनोळखी चोरट्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अहमदनगरच्या 23 वर्षीय तरुणाची आठ दिवसांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण गावच्या हद्दीतील धाडगेमळा रस्त्यावर रविवारी (दि. 29) रात्री साडेबाराच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी संबंधित तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्याकडून मोबाईलसह त्याचे पाकीट हिसकावून घेवून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता.

त्यानंतर त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी (दि. 6) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुयश बाळासाहेब गुंड (वय 23, सध्या रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर, मूळ रा. संकरापूर, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)