बिहारमध्ये रालोसपा नेत्याची हत्या-एका वर्षात चौथी घटना 

पाटणा  – रालोसपा (राष्ट्रीय लोक समता पार्टी)चे नेते अमित भूषण यांची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ते पाटणा पालिगंज ब्लॉकचे अध्यक्ष होते. या वर्षात हत्या झालेले अमित भूषण हे रालोसपाचे चौथे नेते आहेत. एका सांस्कृतिक कार्यक्रमाला ते गेले होते. कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडत असताना काही बदमाशांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या घातल्या.

अमित भूषण यांना चार गोळ्या लागल्या. अंधाराचा फायदा घेऊन बदमाश पळून गेले. अमित भूषण यांना गोळ्या घातल्या तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांच्या शेजारी उभे होते, असे सांगण्यात आले आहे. रालोसपाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या हत्या का होत आहेत असा प्रश्‍न बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विचारत बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा दावा केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)