पश्‍चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याच्या मुलीचे अपहरण नाट्य

कोलकाता (पश्‍चिम बंगाल) – पश्‍चिम बंगालमधील एक स्थानिक भाजपा नेते सुप्रभात बटव्याल यांच्या मुलीच्या अपहरण प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. तिचे गुरुवारी बंदुकीच्या धाकाने अपहरण करण्यात आले होते. तिच्या अपहरणामागे तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. सुप्रभात बटव्याल हे सुमारे पाच महिन्यापूर्वी तृृणमूल कॉंग्रेस सोडून भाजपात सामील झाले आहेत. तृणमूल कॉंग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते माकपाच्या जिल्हा समितीचे सदस्य होते.

वीरभूम पोलीसांनी दिनाजापूर पोलीसांच्या सहकार्याने बटव्याल यांच्या मुलीला दालखोला रेल्वेस्टेशन भागातून आज सकाळी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात तिच्या वडिलांचा-सुप्रभात बटव्याल यांचाच हात असल्याच्या संशयावरून पोलीसांनी त्यांना आणि अन्य दोघांना अटक केली आहे. सत्य काय आहे हे जाणून घेण्यसाठी मुलीची चौकशी चालू असल्याचे पोलीस अधीक्षक श्‍याम सिंह यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुलीचे अपहरण नाट्य करण्यामागे बटव्याल यांचे दोन हेतू असल्याची शक्‍यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. एक तर कौटुंबिक कारण आणि दुसरे म्हणजे त्याचा राजकीय फायदा घेणे.

मुलीचे अपहरण झाल्यानंतर लाभपूर क्षेत्रत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. तीन दिवस आंदोलने करून सुरी-कटवा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. शनिवारी स्थानिक आमदार मनिरुल इस्लाम यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला होता. त्यांना पोलीस ठाण्यात आश्रय घ्यावा लागला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)