कायदा सुव्यवस्थेसाठी महाराष्ट्र- कर्नाटक पोलिस संयुक्त कारवाई करणार 

कोल्हापूरच्या महाराष्ट्र – कर्नाटक बॉर्डर मिटिंग मध्ये वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित
सतेज औंधकर

कोल्हापूर – लोकसभा निवडणूकांच्या कालावधीत सीमा भागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र- कर्नाटक पोलिस संयुक्त कारवाई करणार आहेत. यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमा भागात तपासणी नाके, गुन्हेगारांवर कारवाई, अवैध वाहतूक रोखणे आणि तस्करी रोखण्यावर महत्वपूर्ण चर्चा झाली आहे.

देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस अधिकाऱ्यांच्यात समन्वय रहावा या उद्देशाने दोन्ही राज्यातील अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांची बॉर्डर मिटिंग आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात झालेल्या या बॉर्डर मिटिंगमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक व्याप्त सीमा भागामध्ये लोकसभा निवडणूक काळात दोन्ही राज्यातील पोलीस दलांत शांतता आणि कायदा , सुव्यवस्था अबाधित रहावी यासंदर्भात प्रामुख्याने चर्चा झाली.

या बैठकीला महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग तर कर्नाटकातील बेळगाव, गुलबर्गा, विजापूर परिसरातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर , बेळगाव आणि गुलबर्गा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, बेळगावचे पोलीस आयुक्त तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर ग्रामीण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक कांचा समावेश होता. या बॉर्डर मिटिंग मध्ये आंतरराज्य गुन्हे करणाऱ्या टोळ्या संदर्भात चर्चा झाली.

त्या सोबत कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागात होणारी अवैध वाहतूक रोखणे, अधिकाधिक सीमा तपासणी नाके (चेक पोस्ट उभारणे), ते चेक पोस्ट 24 तास खुले ठेवणे, सीमा भागात होणारी तस्करी रोखणे यासोबतच लोकसभा निवडणूक दरम्यान काय घ्यायच्या खबरदाऱ्या संदर्भात सुमारे दीड तास चर्चा झाली. या बॉर्डर मिटिंग मध्ये महाराष्ट्र पोलीस आणि कर्नाटक पोलीस यांच्यात समन्वय रहावा हा उद्देश आहे. कोल्हापुरात झालेल्या या बॉर्डर मीटिंग मुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सीमा भागामध्ये शांतता प्रस्थापित होण्यास नक्कीच मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)