कराडच्या सभेस पाच जिल्ह्यातील कार्यकर्ते येणार

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ

कराड – कराड कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शुभारंभ रविवारी सायंकाळी 5 वाजता येथील दत्त चौकात होणार आहे. या प्रचार शुभारंभास सातारा सांगली कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि सातारा लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ही प्रचार सभा नसून परिवर्तनाची चळवळ असणार आहे. या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही खा. उदयनराजेंनी केले.

यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार आनंदराव पाटील आमदार विश्वजीत कदम, युवा नेते सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राजेंद्रसिंह यादव, मनोहर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी सरकार कडून गेल्या पाच वर्षात कोणतीही ठोस कामे करता आली नाही शेतकरी व्यापारी रोजगार आदींच्या आशा ह्या संपले आहेत मोदी सरकार कडून लोकशाहीला घातकच काम झाले असून त्यांनी स्वायत्त संस्थांचे अधिकार काढल्यामुळे हुकूमशाहीकडे वाटचाल चालली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी देशांमध्ये आम्ही तेवीस पक्ष एकत्र आलो आहेत यामुळे भाजपचा पराभव हा निश्‍चित आहे कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रचार शुभारंभ कराड येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे यापूर्वी ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ होईल.

उदयनराजे भोसले म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजप सरकार कडून सर्वच घटकांची दुरावस्था झालेली आहे देशातील शेतकरी तरुण व्यापारी हे देशोधडीला लागले आहे निवडणुकीपुरता संकुचित विचार न करता देशात परिवर्तन घडवून आणायचे आहे तरच देश महासत्ता कडे वाटचाल करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत नाराजीबाबत विचारले असता खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी राहिलेली नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. जर माझ्याकडे जादूची कांडी असती तर मी बिनविरोधच झालो असतो, अशी मिश्‍किल टीपण्णीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)