जीवनगाणे : देण्यातला आनंद   

अरुण गोखले 

आई!..आई… श्रीकांतची हाक ऐकली आणि आई मात्र काय समजायचे ते समजली. तिने त्या हाकेच्या स्वरावरूनच ओळखले की आज श्री फार खूष आहे. त्याला आपल्याला काहीतरी सांगायच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळेच तेवढीच तत्परता दाखवत ती त्याच्याकडे आली. त्याला जवळ घेत तिने विचारले, काय श्री कशी झाली ट्रीप? खूप मज्जा मज्जा केली ना? आज स्वारी अगदी खूष दिसतेय.

अग आई! आज ना… श्रीकांत आईच्या जवळ जाऊन तिला बिलगत म्हणाला.
काय झालं आज? तिने पुन्हा एकदा प्रेमाने विचारले. तेव्हा आईला आपल्या जवळ बसवून घेत तो म्हणाला, आई आज ना आज आम्ही सारेजण जेव्हा जेवायला बसलो ना तेव्हा एक गंमतच झाली. अग तो माझ्या वर्गातला नंदू आहे ना तो माझ्या शेजारी बसला होता. मी नंदूला विचारले, नंदू! तू काय आणलं आहेस आज डब्यात? त्यावर तो म्हणाला.. श्री आज माझ्या आईने मला गूळपोळी दिली आहे.
काय! गूळ पोळी … अरे वा… गूळपोळी तर मला फार आवडते. नंदू तू मला तुझ्याकडची गूळ पोळी देशील. मी तुला शिरा पुरी देतो… मी म्हणालो.

त्यावर नंदू म्हणाला, हो देईन की पण माझी गूळ पोळी आवडेल का तुला?
मी म्हणालो, हो आवडेल की, का नाही आवडणार?..आणि…..आणि काय? आईने विचारले,
तेव्हा श्री म्हणाला, आई! नंदूनी त्याचा डबा उघडला, तर त्याच्या डब्यात दोन पोळ्या आणि चक्क पाचसहा गुळाचे लहान खडे होते. त्याने त्याच्या कडची अर्धी पोळी आणि दोन गुळाचे खडे मला दिले. मी माझ्या कडची शिरा-पुरी त्याला दिली. आई त्याची ती साधी गूळ पोळीही मला खूप गोड लागली आणि “काय झालं… आईने विचारले.

आई! त्यावेळी मला तू परवा सांगितलेली गोष्ट आठवली. तू जे सांगितलं होतंस ते आठवलं. तू सांगितलं होतंस ना, की घेण्यापेक्षा देण्यात फार मोठा आनंद आणि समाधान असत म्हणून. आज ते समाधान, तो आनंद मी घेतला. घेण्याबरोबरच देण्यात काय आनंद असतो आणि आपल्या देण्याने दुसऱ्याला आपण किती सुखी समाधानी करतो ते मला समजले.
श्रीच ते बोलणं ऐकून त्याची आई मनोमन सुखावली. त्याच्या डोक्‍यावरून प्रेमाने हात फिरवीत म्हणाली, बाळ! आयुष्यात असाच देता हो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)