आयफोन घेतला तर नोकरी जाईल!

हुआवे घेतला तर डिस्काऊंट मिळेल-चिनी कंपन्या

बीजिंग (चीन): आयफोन घेतला तर नोकरी जाईल, हुआवे घेतला तर डिस्काऊंट मिळेल अशा घोषणा अनेक चिनी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केल्या आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांनी आयफोन सोडून हुआवे फोन खरेदी करावा यासाठी चिनी कंपन्या मोठा डिसकाऊंट देत आहेत. ऍपल उत्पादने खरेदी करणारांस नोकरीवरून काढून टाकण्यात येईल असे शांघायच्या एक व्यापारी संघटनेने म्ह्टले आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हुआवेचे मुख्य वित्तीय अधिकारी मेंग वानझोऊ यांना अमेरिकेच्या सांगण्यावरून कॅनडात अटक झाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांनी आयफोन टाकून हुआवे फोन घ्यावा म्हणून अनेक कंपन्या 10 ते 20 टक्के अनुदान देत आहेत. काही कंपन्या तर आपल्या कर्मचाऱ्यांना हुआवे फोनची संपूर्ण किंमत देण्याचे आश्‍वासन देत आहेत. मोबाईल फोनप्रमाणेच हुआवेच्या इतर उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अनेक कंपन्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

चीनच्या एका न्यायालयाने डिसेंबरमध्ये आयफोनच्या आयातीवर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. आपल्या दोन पेटंटचे आयफोनने उल्लंघन केल्याचा क्वालकॉमने दावा केला होता. ही बंदी टाळण्यासाठी ऍपलने आयओएसमध्ये एक छोटा अपडेट दिला होता. चीनसाठी आपल्या सॉफ्टवेयरमध्ये काही खास बदल केल्याचे आयफोनने म्हटले आहे.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)