जम्मू-श्रीनगर महामार्ग पाचव्या दिवशीही बंद

श्रीनगर: बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग पाचव्या दिवशीही बंदच राहिला. त्यामुळे या महामार्गावर दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली आहेत. जम्मू आणि श्रीनगरला जोडणाऱ्या जवाहर बोगद्याच्या काझीगंद बाजुकडील भागही बर्फवृष्टीमुळे बंद पडला आहे. ही वाहतूक सुरळीत करण्याचे कसोशिचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. कालही काश्‍मीर खोऱ्यात नव्याने बर्फवृष्टी झाली त्यामुळे खोऱ्यातील शीत लहर पुन्हा परतली आहे.

दक्षिण काश्‍मीरातील तापमान उणे 1.5 अंशावर गेले आहे. काझीगंद मधील तापमान 1.8 अंशावर गेले आहे. कोकेनगर्ग येथील तापमान उणे तीन अंशावर गेले आहे. गुलमर्ग मध्ये उणे 10, पहलगाम मध्ये उणे 6.1 अंश सेल्सीयस आणि लेह मध्ये उणे 12.9 अंश सेल्सीयस इतके नोंदवले गेले आहे. कारगील मध्ये थंडीने कहर केला असून तेथील तापमान 18.4 उणे अंश सेल्सीयस इतके झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)