विमा कंपन्याकडे दावा न केलेली मोठी रक्कम पडून 

नवी दिल्ली: देशातील 23 विमा कंपन्यांकडे मार्च 2018 अखेर 15,167 कोटी रुपये पडून असून त्यावर कोणत्याही विमा धारकाने दावा केलेला नाही. या विमाधारकांची ओळख निश्‍चित करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने या कंपन्यांना केले आहे.
ज्या विमा कंपन्यांकडे ही रक्कम पडून आहे त्यात सर्वाधिक म्हणजे 10,509 कोटी रुपये एलआयसीकडे पडून आहेत. याशिवाय खासगी विमा कंपन्यांकडे 4,675 कोटी रुपये आहेत.
आता केंद्र सरकारने ही रक्कम विमा पॉलिसीधारकांकडे अथवा त्यांच्या वारसांकडे पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आयसीआयसीआय प्रोडन्शिअल लाइफ इन्शुरन्स कंपनीकडे 807.4 कोटी रुपये, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्सकडे 696.12 कोटी, एसबीआय लाइफ इन्शुरन्सकडे 678.59 कोटी आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सकडे 659.3 कोटी रुपये पडून आहेत.
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आता सर्व विमा कंपन्यांना सांगितले आहे की, आपल्या वेबसाइटवर सर्चफची सुविधा देऊन ही रक्कम मूळ पॉलिसीधारकाला अथवा त्याच्या वारसाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. डिजिटायजेशनमुळे आगामी काळात अशी ओळख पटविण्यात मदत होणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)