गावठी बॉम्बच्या स्फोटात मजूर जखमीजावली तालुक्‍यातील

वडाचे म्हसवे येथील घटना
बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी

कुडाळ  – जावळी तालुक्‍यातील वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधाऱ्याचे काम करत असताना अचानक गावठी बॉम्बचा स्फोट होऊन यात एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. दादासो शामराव चव्हाण असे जखमी मजुराचे नाव असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधाऱ्याचे काम सुरू होते. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सर्व मजूर बंधाऱ्यावर काम करत असताना अचानक दगडाखाली गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्यामुळे चव्हाण गंभीर जखमी झाले. इतर कामगारांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, हा बॉम्ब याठिकाणी कोणी आणि का आणला होता, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जंगल परिसरात आणखी असे गावठी बॉम्ब असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत असून याप्रकरणी कसून चौकशी व्हावी अशी मागणीही परिसरातील नागरिकांतून होत आहे. घटनेनंतर ज्या ठिकाणी गावठी बॉम्बचा स्फोट झाला त्या ठिकाणी बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. परिसरात इतर ठिकाणी कोठे आणखी बॉम्ब आहेत का? याची कसून तपासणी सुरू आहे. या तपासणीसाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, वन्यप्राणी आणि रानडुकरे मारण्यासाठी दगडांमध्ये गावठी बॉम्ब सदृश वस्तू ठेवण्यात आले असाव्यात अशी माहिती, सहायय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने यांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)