सोशल मिडियावर व्हिडियो व्हायरल
बंगळुरू -बंगळुरूच्या कोडिगेहल्ली गावातील काही लोकांनी एका महिलेला एका खांबाला बांधुन मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असुन या महिलेने काही लोकांकडून कर्ज घेतले होते. मात्र, त्याची परतफेड करणे तिला शक्य नसल्याने तिला अशा प्रकारे अमानुष मारहाण केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडियोत महिलेच्या आजुबाजूला खूप लोक उभे आहेत. त्यातले काही लोक महिलेला बांबूच्या साहाय्याने अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गावातल्या 7 लोकांना अटक केली आहे. अटक केलेल्या लोकांनी सांगितलं की, या महिलेने त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं आणि कर्ज फेडायची वेळ आली तेव्हा ही महिला कर्ज फेडू शकली नाही.