स्विस बॅंकेतील ‘त्या’ भारतीयांची माहिती लवकरच येणार समोर

नवी दिल्ली : भारताच्या स्वित्झर्लंडसोबतच्या बॅकिंग क्षेत्रातील माहिती देवाणघेवाण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता स्विस बॅंकेत गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची माहिती लवकरच समोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ऑटोमॅटिक एक्‍स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन (एईओआय) करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. हा करार मागील वर्षापासून अंमलात आला आहे. स्विस अर्थमंत्रालयातील अधिकारी आणि स्विस फेडरल कर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला माहिती दिली आहे. यात त्यांनी भारताचा विचार करता काही माहिती पाठविणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे.

बॅंक खात्यांबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येणारा भारत हा 73 देशांपैकी एक देश आहे. गेल्या वर्षी एईओआयची 36 देशांबरोबर याबाबत अंमलबजावणी झाली आहे. बॅंकिंग क्षेत्राबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यापूर्वी कायदेशीर आणि संसदीय पद्धतींची पूर्तता करण्यात आली आहे, असे स्विस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)