वनस्पती तेल आयातीत वाढ

नवी दिल्ली – वनस्पती तेलाच्या आयातीत फेब्रुवारीत 7 टक्‍क्‍यांनी वाढ होत 12 लाख टनावर पोहोचल्याची माहिती उद्योग संघटना एसईए यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मुख्यतः वनस्पती तेलामध्ये खाद्यतेल आणि अखाद्य तेल असे दोन प्रकारच्या तेलाचा समावेश असल्याचे म्हटले आहे.

वनस्पती तेलाची आयात चालू वर्षातील फेब्रुवारीमध्ये 12,42,533 टन राहिली. हाच आकडा मागील वर्षातील फेब्रुवारी 11,57,044 टनावर राहिला होता. जानेवारी 2019मध्ये पामतेलावर आकारण्यात येणाऱ्या आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे या तेलाच्या आयातीत बरीच वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)