मुजफ्फरपुर मधील घटना खूप लाजिरवाणी- नितीश कुमार

पटना: बिहार मधील मुजफ्फरपुर येथे बालिका गृहात झालेल्या बलात्कार प्रकरणावर अखेर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुजफ्फरपुर मधील घटना खूप लाजिरवाणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुजफ्फरपुर येथील घटनेमुळे अवघा देश ढवळून निघाला आहे. मात्र आतापर्यंत नितीश कुमार यांनी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते.

नितीश कुमार म्हणाले, “सदर घटनेचा सीबीआय तपास करत असून या प्रकरणात मी अजिबात दया करणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्याचे मी आश्वासन देतो.”

मुजफ्फरपुरमध्ये ४४ मुलींपैकी ३४ मुलींवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)