चीनच्या मोबाइल कंपन्यांचा प्रभाव वाढला 

भारताबरोबर अमेरिकेच्याही कंपन्यांना टाकले मागे 

नवी दिल्ली – केंद्र सरकारने मेक इन इंडिया धोरण अंगीकारले आहे. त्याचबरोबर इलेक्‍ट्रॉनिक वस्तूची भारतात आयात कमी व्हावी याकरिता या वस्तूंच्या आयातीवर जास्त शुल्क आकारले आहे. मात्र, तरीही चीनच्या मोबाइल कंपन्यांनी भारतातील प्रभाव वाढविला आहे. या कंपन्यांनी भारतातील मोबाइल कंपन्यांना मागे टाकले आहेच, त्याचबरोबर अमेरिकेच्या मोबाइल कंपन्यांनाही मागे टाकले आहे. यामुळे भारत सरकारला देशातील कंपन्यांचे उत्पादन वाढावे याकरिता प्रयत्न करावे लागणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय बाजारपेठ खेळण्यांपासून दैनंदिन वापरातील वस्तूंनी चीनने व्यापलेली आहेच. मात्र, चीनच्या चार मोबाइल कंपन्यांनी भारतातून मोठ्या प्रमाणात पैसा नेला आहे. शाओमी, ओप्पो, व्हिवो आणि हुवाई या कंपन्यांनी 2018 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 51,722 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता भारत सरकार या कंपन्यांना उत्पादन भारतात घेण्यास सांगत आहे. त्यामुळे काही कंपन्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

या चीनच्या चार कंपन्यांनी अमेरिकेच्या आघाडीच्या कंपन्या ऍपल आणि चीनलाही मागे टाकले आहे. ऍपलने 2018 मध्ये 13098 कोटी रुपये कमावले आहेत. तर गुगलने भारतातून 9337 कोटी रुपये कमावले आहेत. देशामध्ये गेल्या काही वर्षात चीनविरोधी वातावरण असले तरीही भारतीयांची पसंती चिनी बनावटीच्या उत्पादनांना असल्याचे यावरून दिसत आहे. या कंपन्यांनी 2018 मध्ये 2017 पेक्षा 22,460 कोटी जास्त कमावले आहेत.

चीनच्या या कंपन्या स्वस्तामध्ये मोबाइल उपलब्ध करतात. यामध्ये ऍपलसारख्या कंपन्यांच्या मोबाइलमधील फिचर्स सहज उपलब्ध असतात. तसेच या कंपन्यांच्या मोबाइलचा दर्जाही चांगला असतो. परवडणाऱ्या किमतीपासून प्रिमियम श्रेणीमध्येही मोबाइल उपलब्ध होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)