पत्नीला दासी समजणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका

पुणे – पत्नीचा कौटुंबिक छळ करून तिला दासी समजणाऱ्या दुबईस्थित पतीसह त्यांच्या घरच्यांना न्यायालयाने झटका दिला आहे. तिला प्रतिमहा 5 हजार पोटगी देण्याबरोबरच तिचा लेखी, तोंडी, इलेक्‍ट्रॉनिक, टेलीफोनद्वारे छळ होईल, असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई केली आहे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. पाटील यांनी दिला
आहे.

पीडित पत्नीच्या वतीने ऍड. साजीद शाह यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्या आधारे पोटगीची मागणी करण्यात आली होती. सलमान आणि जोया (दोघांची नावे बदललेली) यांचा विवाह ऑगस्ट 2013 झाल्यानंतर ती सासरी नांदण्यासाठी आली. आई-वडिलांनी तब्बल 6 लाख रुपये खर्च करून तिचे लग्न लावून दिले. लग्नाच्या एक महिन्यानंतरच पतीच्या घरच्यांनी त्यांचे रंग दाखविणे सुरू केले. पती तिच्या चारित्र्यावर संशय करायचला लागला. त्याने तिला घाणेरड्या शिव्या देण्याबरोबरच मानसिक, शारीरिक त्रास देण्यास सुरूवात केली. सासू तिला एखाद्या गुलामाप्रमाणे वागवत होती. गरजेपेक्षा जास्त कामे करण्यास सांगून ती सलमानाला भडकवून पत्नीला मारहाण करण्यास भाग पाडत होती. वारंवार तिला तलाक देण्याच्या धमक्‍या दिल्या जात होत्या. तिच्या दिरानेही तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)