भाषेच्या इतिहासाकडे नव्या नजरेने पहायला हवे

डॉ. गणेश देवी : दुजाभाव केल्यास भाषा टिकविणे अशक्‍य

सातारा – जगात वर्गभेदामुळे बहुतांश भाषांवर संकटे निर्माण झाली आहेत. भाषेच्या बाबतीत वर्गभेद व दुजाभाव कायम राहिला तर भाषा टिकविणे अशक्‍य होईल. त्यामुळे ज्या भाषेमुळे माणुसकी निर्माण झाली आहे. ती माणुसकी टिकविण्यासाठी आता भाषेकडे नव्या नजरेने पाहणे गरजेचे आहे, असे मत भारत भाषा सर्वेक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आकाशवाणी, पुणे आणि रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पुरूषोत्तम लाड स्मृती व्याख्यानमालेत आयोजित भाषा-बोलीभाषा : वास्तव आणि आव्हान विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेचे सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर , रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, पुणे आकाशवाणीचे केंद्रासंचालक गोपाळ आवटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.देवी म्हणाले, कोणतीही ऐतिहासिक भाषा सरकारने निर्माण केलेली नाही. ती लोकतांत्रिक व लोकांनी निर्माण केलेली आहे. त्यामुळे ती टिकली पाहिजे. मात्र, आज जगातील हजारो वर्षापुर्वीच्या 6 हजार पैकी 4 हजार भाषा ह्या येत्या तीस ते चाळीस वर्षात नष्ट होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक नव्वदच्या दशकात ज्या भाषा मुद्रित व त्यांचे साहित्य निर्माण झाले अशाच भाषा टिकून राहिल्या. मात्र, ज्या भाषांना साहित्यामध्ये स्थान मिळाले नाही. त्या काळानुरूप लोप पावत गेल्या. सध्या भारतातील मराठी, तेलगू, बंगाली व हिंदी या भाषा जगातील भाषांमध्ये अग्रस्थानावर आहेत. त्या टिकण्यामागे शिक्षण, संगीत, नाटक व चित्रपटांची होणारी निर्मिती ही मुळ कारणे ठरली आहेत. मात्र, भाषा जीवंत ठेवण्यासाठी ज्ञान व बाजार वापराची देखील तितकीच गरज आहे. भाषा मनुष्यापासून दूर गेल्या तर मुळ भाषेची पाळेमुळे देखील नष्ट होवून हानी पोहचणार आहे.

त्याचबरोबर एकेकाळी भारतात अनेक बोलीभाषा होत्या. मात्र, त्या प्रांतरचनेत विभागल्याने व शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश न झाल्यामुळे त्या बोलीभाषा नष्ट झाल्या. सन 1961 च्या आकडेवारीनुसार देशात 1 हजार 652 मातृभाषा होत्या. मात्र, पुढील दहा वर्षात मातृभाषांची आकडेवारी घसरली व ती 108 वर येवून पोहचली. तर 109 व्या कॉलममध्ये उर्वरित भाषा असा उल्लेख करण्यात आला. यावरून येत्या तीस ते चाळीस वर्षात उर्वरित तब्बल दिड हजार भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती डॉ.देवी यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)