शेंद्रे येथे महामार्गाला तडा

वाहतूक धोकादायक ः कामाच्या चौकशीची मागणी

नागठाणे – ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावरील शेंद्रे (ता.सातारा) येथील उड्डाणपुलाचा सुमारे पाऊण ते एक फूट व्यासाचा कॉंक्रीट स्लॅबचा तुकडा तुटून पडल्याने या उड्डाणपुलाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
आशियाई महामार्गावर शेंद्रे येथे लाखों रुपये खर्चून मोठा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. आय.टी. डी कंपनीने हा उड्डाणपूल बांधला आहे. सुमारे चार वर्षांपुर्वी हा सहा पदरी उड्डाणपूल वहातुकीसाठी खुला झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमवारी उड्डाणपुलाच्या कराड ते सातारा बाजूकडील लेनवरील उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूचा सुमारे पाऊण ते एक फुटाचा कॉंक्रीट स्लॅबचा तुकडा निखळून पडला. लोखंडी सळ्या उघड्या पडल्या. त्यामुळे या उड्डाणपुलावरून वहातुक करणे धोकादायक झाली. मंगळवारी सकाळपासून आय.टी. डी कंपनीने कराड ते सातारा बाजूकडील वाहतुकीच्या दोन लेन बंद ठेवून काम सुरू केले होते. महामार्गावर डांबराचा सुमारे 10 फूट बाय 19 फूट लेअर ब्रेकरने काढुन वरचे कॉंक्रीट स्लॅब मोकळा केला होता. उड्डाणपुलाखाली निखळलेल्या स्लॅबच्या ठिकाणी कॉंक्रीटीकरण करण्याचे काम सुरू होते. मात्र वाहातुकीस खुला झाल्यानंतर अल्पावधीतच या उड्डाणपुलाचे कॉंक्रीट अचानक निखळून पडल्याने आय.पुलाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)