छत्तीसगड मध्ये तांदळाला देशातील सर्वाधिक भाव : कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

रायपुर: छत्तीसगड मध्ये तांदळाला 2500 रूपये प्रति क्वींटल असा हमी भाव जाहीर केला असून हा देशातील सर्वात अधिक हमी भाव आहे अशी माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांनी काल विधानसभेत बोलताना दिली. काल विधानसभेत राज्याचे तिसरे पुरवणी अंदाजपत्रक मंजुर करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्या दहा दिवसांत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहींर करू अशी ग्वाही दिली होती ते आश्‍वासन आम्ही पुर्ण केले आहे.

पुरवणी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 7 हजार 307 कोटी रूपये आणि तांदळाच्या हमी भावासाठी 3084 कोटी रूपयांची तरतूद केली आहे असेही त्यांनी जाहीर केले. ते म्हणाले की आम्हाला सेत्तवर येऊन 20 दिवसही झालेले नाहीत तोच भाजपने आमच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करायला सुरूवात केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्हाला आधीच्या सरकारची घाण आधी काढावी लागेल. फायलींवर साठलेली धूळ झटकावी लागेल आणि पंधरा वर्षांच्या काळात भाजप सरकारने केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची तड लावावी लागेल. हे सगळे काम आम्ही आधी करणार आहोत आम्ही निवडणुकीतील आश्‍वासनांची पुर्तताही निश्‍चीत कालमर्यादेत पुर्ण करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)