तिहेरी तलाक प्रकरणी आरोपीला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई: पत्नीला तलाकची नोटीस पाठवून काडीमोड घेण्याच्या प्रयत्नात गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या इन्तेखाब आलम मुन्शी या तरूणाला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने 15 हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

वसई येथे राहणाऱ्या मुन्शी याचा 1998 साली विवाह झाला. त्याला तीन अपत्ये आहेत. या वर्षी मे महिन्यात मुन्शीने त्याच्या पत्नीला माहेरी पाठवले आणि जुलैमध्ये तलाक मिळावा. यासाठी पत्नीला नोटीस बजावून घटस्फोटाची मागणी केली होती. 22 सप्टेंबरला तिहेरी तलाक झाला असल्याची नोटीस सदर महिलेला मिळाली.

-Ads-

याप्रकरणी त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून आपल्याला केव्हाही अटक होईल या भितीने आरोपी पती मुन्शी याने पालघरच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. परंतू सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावल्याने त्याने हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)