वांद्रे वर्सोवा सीलिंकचे काम हायकोर्टाने रोखले

कांदळवनांची कत्तल करुन कास्टिंग यार्डची उभारणी

एमएसआरडीसीला हायकोर्टाचे आदेश

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई, (प्रतिनिधी): मुंबईतील प्रसिद्ध जुहू समुद्रकिनाऱ्यावरील कांदळवनांची कत्तल करुन त्याठिकाणी कास्टींग यार्ड उभारणाऱ्या एमएसआरडीसीला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. पुढील सुनावणीपर्यंत वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम थांबवा. असा आदेशच मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाने एमएसआरडीसीला आज दिले. तसेच हे काम सुरु राहता कामा नये याकडे लक्ष ठेवा असे सांताक्रूझ पोलीसांना बजावले.
जूहू कोळीवाडा किनाऱ्यावर वांद्रे वर्सोवा सी लिंकच्या कामासाठी लागणारे सिमेंटचे पिलर्स, बीम, गर्डर्स तयार करण्यासाठी कास्टिंग यार्ड उभारण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 7.9 हेक्‍टर जागा ताब्यात घेण्यात आली असून याजागेवरील कांदळवनांची कत्तल करण्यात आली आहे. तसेच किनाऱ्यावर मातीचा भराव टाकण्यात आल्याने उरलेल्या कांदळवनांना समुद्राचे पाणी मिळत नाही. त्यामुळे ही कांदळवने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ता झोरु भातेना यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
किनाऱ्यावर टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे समुद्राचे पाणी उर्वरित कांदळवनांना मिळत नाही. त्यामुळे कांदळवनांचा बळी जात आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच हे काम सुरू करण्यापूर्वी वनविभागाची परवानगीही घेण्यात आलेली नाही असा आरोप केला.. हायकोर्टाने याची गंभीर दखल घेत संबधित काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)